What is the History of Maruti and Suzuki : मारुती सुझुकी कंपनी किती जुनी आहे?

What is the History of Maruti and Suzuki :सुरुवातीच्या काळात मारुती सुझुकी ही एक सरकारी कंपनी होती. 70 दशकामध्ये भारतीय लोकां कडे गाड्यांचे खूप कमी पर्याय होते. तेव्हा सर्वसाधारण लोकांसाठी गाडी घेणे खूप कठीण होतं त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे गाड्या ह्या बाहेर देशातून आपल्या देशामध्ये बोलावण्यात येत होत्या. त्यामुळे त्यांना घेणं आणि मेंटेन करणं खूप अवघड होतं.

 

 

सुरुवातीचा काळ कसा होता?

सर्वसाधारण लोकांसाठी कोणती तरी गाडी असावी आणि ते पण आपल्या आपली भारतीय कंपनी त्यासाठी मारुती या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. ही कंपनी भारतीय असणे मागचे प्रमुख कारणे म्हणजे त्याची किंमत हे कमी पडेल आणि एक स्वदेशी कंपनी आपल्यासमोर येईल.

What is the History of Maruti and Suzuki

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

कंपनीचे नाव कसे पडले?

1970 मध्ये Maruti Technical Services (MTSPL)
या नावाने एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुरुवात ही झाली होती. या कंपनीचे काम गाडी डिझाईन करणे आणि मॅन्युफॅक्चरिंग बद्दल ट्रेनिंग देणे हे होतं.

1971 मध्ये इंदिरा गांधी यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याच्या सरकारने सोबत मिळून सर्वसामान्य लोकांसाठी गाडी बनवणारी कंपनी Maruti Limited म्हणजेच याची स्थापना केली.

मारुती सुझुकीच्या सुरुवातीच्या काळातल्या गाड्या ओमनी( omni) , मारुती 800 (Maruti 800),जिप्सी Gypsy या होत्या.

संजय गांधी यांना या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर करण्यात आलं होतं . सुरुवातीच्या काळात काही विदेशी कंपनीसोबत करार करून कंपनी चालवण्याचा विचार होता पण विदेशी कंपनीने यामध्ये फारसा काही रस दाखवला नाही.

विदेशी कंपनीचे तंत्रज्ञानाशिवाय गाडी बनवणे हे अशक्य होतं त्यामुळे विदेशी तंत्रज्ञान असणे आवश्यक होतं. त्यामुळे संजय गांधी यांना गाडी बनवण्यात अपयश आलं.

Maruti Udyog ltd ची सुरुवात?

25 % एवढा हिस्सेदारीवर सुझुकी कंपनीसोबत करार करून मारुती उद्योगी कंपनी चालू झाली. त्यानंतर मारुती  800 ,ओमनी आणि जिप्सी या गाडीसाठी खूप प्रसिद्ध झाली आणि कंपनीने भरपूर नफा कमवला त्यानंतर सुझुकी कंपनीने आपल्या वाटा हा 40% एवढा केला आणि कंपनीचे काम जोरात चालू झाले. त्यानंतर या कंपनीचे नाव Maruti Suzuki हे पडलं.

Conclusion निष्कर्ष

त्या काळामध्ये सामान्य माणसाला फोरविलर म्हणजे चार चाकी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने केलेला हा प्रयत्न म्हणजेच मारुती सुझुकी ही कंपनी आहे.पहिल्या गाडीनंतर सुझुकी कंपनीने तंत्रज्ञानामुळे पहिली गाडी मारुती 800 हे बनली त्यानंतर भारतात सर्वसाधारण लोकांना गाडी मिळायला लागली आणि ही गाडी लोकांना खूप पसंद पडली.

FAQ

Q. सुझुकी भारतात केव्हा आली?

Ans :सुझुकी कंपनी 24 फेब्रुवारी 1981 मध्ये भारतामध्ये आली.
आणि मारुती 800 या गाडीपासून भारतीय मार्केटमध्ये प्रसिद्ध झाली.

Q. सुझुकी ची मालिक कोणत्या देशाची आहे?

Ans : सुझुकी कंपनीचा मालिक हा जापान या देशांमध्ये राहतो मारुती सुझुकी मध्ये मारुती ही मॅन्युफॅक्चरिंग होती आणि सुझुकी या कंपनीची टेक्नॉलॉजी यामध्ये वापरण्यात आली होती.

Leave a Comment