मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण माहिती घेणार आहोत गाडीच्या इंजिनच्या ऑइल बद्दल इंजिनल बदललं नाही त्यामुळे गाडीवर काय काय परिणाम होतात.तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचं वाहन असेल तर हा लेख शेवटपर्यंत पण नक्की वाचा..
Oil change Tips in Marathi
मित्रांनो गाडी फोर व्हीलर असो की टू व्हीलर असो त्यामध्ये इंजिन हे असतच त्यासोबतच
आपल्याला त्या इंजिनची काळजी घेणे हे महत्त्वाचे असते, जेणेकरून आपली गाडी चांगलं
पिकप उत्तम मायलेज आणि जास्त दिवस टिकेल त्यासाठीच इंजिन ऑइल हे महत्त्वाचा घटक आहे.
Oil-change-Tips-in-Marathi |
इंजिन ऑइल आपण किती किलोमीटर बदलेल पाहिजे?
इंजिन ऑइल ची कॅपॅसिटी हे गाडीच्या रनिंग वर डिपेंड असते, म्हणजेच की गाडी किती किलोमीटर
चालते त्यानुसार इंजिनची ऑइल बदलवा लागते.
इंजिन ऑइल हे चार हजार किलोमीटर चालल्यानंतर बदलावे चार हजार किलोमीटर हे टू व्हीलर बाइक साठी आहे.
तुमच्याकडे फोर व्हीलर असल्यास त्या गाडीचं इंजिन ऑइल हे दहा हजार किलोमीटर नंतर बदलावे जेणेकरून आपल्या गाडीचे इंजिन हे चांगलं राहील आणि इंजिनची फिटनेस पण चांगली राहील.
FAQ
माझी गाडी फिरत नाही मला गाडीचं ऑइल चेंज करायची गरज आहे का?
ऑइल किती दिवस चांगला राहत?
इंजिन ऑइल हे ब्रेक ऑइल साठी वापरू शकतो का?
माझी गाडी फिरत नाही मला गाडीचं ऑइल चेंज करायची गरज आहे का?
होय जरी आपली गाडी फिरत नसेल तरीपण कमीत कमी एका वर्षानंतर आपल्या गाडीचा ऑइल बदललं पाहिजे. त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे एका वर्षांनी गाडीच्या ऑइल ची क्वालिटी ही कमी होते, म्हणजेच ते ऑइल कोणत्याही कामाचं राहत नाही. त्यामुळे आपल्याला एका वर्षांनी तरी आपल्या गाडीचा ऑइल बदल पाहिजे.
ऑइल किती दिवस चांगला राहत?
गाडीचं ऑइल हे कमीत कमी एक वर्ष चांगलं राहते. जर तुमच्या गाडीची रनिंग हे जास्त असेल तर ते तुम्हाला किलोमीटर नुसार बदलावा लागतो. जर तुमची गाडी जास्त फिरत असेल तर तुम्हाला सहा महिन्यातून एकदा बदलावा लागते .तर तुमची गाडी जास्त फिरत नसेल तर एक वर्षानंतर तुम्ही गाडीचा ऑइल बदलू शकता.
इंजिन ऑइल हे ब्रेक ऑइल साठी वापरू शकतो का?
नाही आपण इंजिन ऑइल हे ब्रेक ऑइल म्हणून युज करू शकत नाही. त्यामागचे प्रमुख कारण असे आहे की, दोन्हीही ऑइलची ग्रेट म्हणजे गुणवत्ता हे वेगळी असते ब्रेक oil मध्ये डॉट 3 डॉट 4 हे ऑइल आपण वापरतो आणि इंजिन ऑइल साठी Full सिंथेटिक हे ऑइल वापरतो .त्यामुळे या दोन्ही ऑइल मध्ये बदल आहे. सरास ब्रेक ऑइल हे लाल कलरचं असतं आणि इंजिन ऑइल हे येल्लो कलर मध्ये असतं.
हा लिहिलेला लेख जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर आणि नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा.