What to check before delivery of new car?
तुम्ही तुमच्या जीवनातील पहिली कार खरेदी करत असाल
खूप आनंदचा क्षण असतो.अशावेळी कार डिलिव्हरी घेताना मी काय लक्षात ठेवले पाहिजे? अश्यातच तुम्ही खालील प्रकारे
काळजी न घेता कार डिलिव्हरी घेतली आणि फसवणूक झाली तर
तर तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीच्या आनंदा वर पाणी फिरण्यात वेळ लागणार नाही .
कार डिलिव्हरी घेताना डिलर कडून होणाऱ्या चुकीस व फसवंणुकीस बळी न पडता
आपण खालील प्रकारे या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपण फसवले जाणार नाही.
खालील काही फसवणुकीचे मुख्य प्रकार च्या पद्धतीने फसवणूक होते तसेच त्यांचे उपाय .
१) नवीन कार सुरवातीलाच जास्त चालली आहे उदा . १०० किमी .
२) तुम्हाला डेमो कार किंवा टेस्ट ड्राईव्ह कार विकणे.
३) कार डिलिव्हरी च्या दिवशी सगळ्यात पहिले कार न दाखवता संपूर्ण पेमेंट घेणे.
४) कार डिलिव्हरी घेताना ठरलेल्या किमती पेक्षा जास्त पैस्याची विविध कारणे देऊन मागणी करणे.
५) कार इन्शुरन्स शोरूम मधूनच घेणे यासाठी आग्रह करणे
६) कार ऍक्सेसीरिज घेण्यासाठी आग्रह करणे .
७) कार मध्ये काही प्रॉब्लेम असेल तरीही तुम्हाला कार नेण्यासाठी जबरदस्ती करणे
कारण तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट केले राहते
८) कार घेताना नवीन असाल तर कोणाची मदत न घेणे .
वरील अशे काही मुख्य मुद्दे जिथे तुम्ही लक्ष्य देणे महत्वाचे आहे
१) नवीन कार सुरवातीलाच जास्त चालली आहे म्हणेज उदा . ५० ते १०० किलोमीटर .
आपली कार फॅक्टरी मध्ये संपूर्ण तयार झाल्यानंतर विविध गोष्टीसाठी ती चालवली जाते त्यात सगळ्यात महत्वाचं कारण
म्हणजे टेस्टिंग परंतु टेस्टिंग मध्ये जास्तीत जास्त १० किमी गाडी चालवली जाते .त्यापेक्षा जास्त नाही .त्यानंतर कार फॅक्टरी मधून स्टॉकयार्ड
आणि डिलर पर्यन्त ये पर्यन्त गाडी जास्तीत जास्त २० किमी चालते म्हणजे संपूर्ण ३० किमी गाडी चालली आहे .हे नॉर्मल आहे.
परुंतु गाडी उदा . ५० ते १०० किलोमीटर चालली आहे हे नॉर्मल नाही . होऊ शकते तुमची गाडी इतर कामासाठी वापरली आहे .जे
योग्य नाही याबाबत तुम्ही डिलर ला योग्य ते कारण विचारा आणि त्याचा उत्तर पटेल असं असला पाहिज नाही तर तुम्ही याबाबत कस्टमर
केयर ला विचारा जास्त चालली असेल तर नवीन गाडीची मागणी तुम्ही करू शकता किंवा यामध्ये डिस्काउंट ची मागणी करू शकता .
२) तुम्हाला डेमो कार किंवा टेस्ट ड्राईव्ह कार विकणे.
कार पहिल्यांदा जेव्हा आपण पाहायला जातो तिथे कार दाखवण्यासाठी किंवा टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी एक कार असते सगळ्या डिलर
कडे अशी एक कार असतेच मग या गाडीवर विविध लोक टेस्ट ड्राईव्ह घेतात किंवा शोरूम च्या इतर हि कामासाठी हि गाडी वापरली
जाते.कार ची भयंकर डिमांड असेल तर कार डीलर हिच टेस्ट ड्राईव्ह कार तुम्हाला नवीन करून म्हणून देऊ शकतो म्हणून कार ची
नीट चाचणी करून घ्यावी
३) कार डिलिव्हरी च्या दिवशी सगळ्यात पहिले कार न दाखवता संपूर्ण पेमेंट घेणे.
सगळ्यात महत्तवाचा मुद्दा कार डिलिव्हरी च्या दिवशी आपण फार खूष असतो ,परंतु आपण जोश मध्ये होश गमावू नका कारण
कार डिलिव्हरी घेण्यासाठी तरी बरा पैकी वेळ लागतोच अश्यातच आपण शोरूम मध्ये गेल्यानंतर सेल्समन आपल्याला राहिलेलं
संपूर्ण पेमेन्ट सगळ्यात पहिले करून घ्या म्हणजे मी तुमची गाडी नावावर करन्याची सुरवात करतो असे
सांगतो तो पर्यन्त आपली गाडी तयार होईल असे सांगतो परंतु लक्ष्यात ठेवा तुमी जोपर्यंत पैसे दिले नसते तो पर्यन्त तुम्ही राजा असता
नंतर गाडी तुमच्या समोर आल्यानंतर जर काही प्रॉब्लेम आहे तर तो हा किरकोळ प्रॉब्लेम आहे असे सांगून नंतर करून देतो
किंवा दुर्लक्ष करत जर तुम्ही पेमेंट केलं नसल तर तुमचा प्रॉब्लेम प्रायोरिटी वर सोडवण्यात येतो किंवा तुम्ही गाडी पण नाकारू शकता
म्हनून शोरूम मध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले गाडी चांगली चेक करा सूर्यप्रकाशात पहा कारण गोडाउन मध्ये लाईट च्या प्रकाशात
काही गोष्टी सुटू शकतात पेमेंट करन्याची घाई करू नका गाडी मीळयाला थोडा उशीर जरी झाला तरी काही हरकत नाही.
४) कार डिलिव्हरी घेताना ठरलेल्या किमती पेक्षा जास्त पैस्याची विविध कारणे देऊन मागणी करणे.
कार पसंद झाल्यानंतर आपण काही अमाऊंट देऊन कार बुक करतो तेव्हा त्या पावती मध्ये संपूर्ण गोष्टी लिहल्या राहत नाही
काही ठळक गोष्टी जस कार प्राइस किंवा इन्शुरन्स लिहल्या राहतात परंत्तू जेव्हा कार डिलिव्हरी च्या वेळी तुम्हाला जास्तीच्या
काही गोष्टी घेण्यासाठी भाग पडतात किंवा कार किमतीत वाढ झाली आहे .तर तुम्हाला नवीन किमती नुसार पे करावे लागेल अशे
सगळे नियम शिकवले जातात
५) कार इन्शुरन्स शोरूम मधूनच घेणे यासाठी जबरदस्ती करणे
नवीन कार साठी इन्शुरन्स घेणे बंधनकारक राहते कारण ति गाडी तुमच्या नावावर आर टी ओ ला रजिस्टर करावी लागते
परंतु इन्शुरन्स कार डिलर कडून घ्यावे लागते याचे काही बंधन नसते आणि कार डिलर जे इन्शुरन्स किमती देतात
त्याच्या पेक्षा स्वस्त इन्शुरन्स त्याच कंपनी तुम्हाला बाहेरून मिळू शकते स्वस्त म्हणजे जवळपास ३० टक्यांचा फरक
तुह्माला जाणवेल परंतु डिलर तुम्हाला कार इन्सुरन्स इथूनच घेण्याचा आग्रह किंवा जबरदस्ती करेल परंतु
आपण बाहेरून आणलेलया किमती त्याला दाखवून त्याच इन्शुरन्स किमती मध्ये घट करू शकता .
६) कार ऍक्सेसीरिज घेण्यासाठी जबरदस्ती करणे .
नवीन कार घेतल्यानंतर कार मध्ये बऱ्याच ऍक्सेसीरिज ची आवश्यकता राहते सीट कव्हर्स , फ्रंट रिअर गार्ड ,बॅक गार्ड तसेच
अजूनही बरयाच गोष्टी तसेच या ऍक्सेसीरिज ची किंमत शोरूम मध्ये फार जास्त राहते किंवा शोरूम वाले या गोष्टीला कंपलसरी
आहे .तसेच त्याच्या कडून घेण्यासाठी आग्रह करतात या गोष्टी तुम्ही बाहेरून लावून घेतल्या तर तुमच्या वॉरंटी मध्ये कॉम्प्रमाईस होईल
असे सांगण्यात येते परंतु असे काहीही नसते तुम्ही ऍक्सेसीरिज बाहेरून लावून बराच पैसा वाचवू शकतो.
७) कार मध्ये काही प्रॉब्लेम असेल तरीही तुम्हाला कार नेण्यासाठी जबरदस्ती करणे कारण तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट केले राहते
कार चे पेमेंट आपण साधारण २ टप्यात देतो १ बुकिंग रक्कम तसेच उरलेली रक्कम डिलिव्हरी घेताना बुकिंग रक्क्क्म कुठे
जास्त कुठे कमी राहते डिलिव्हरी च्या वेळी कार मध्ये काही प्रॉब्लेम निघाला तर अश्या वेळीस शोरूम वाले किरकोळ प्रॉब्लेम
सांगून किंवा १ सर्विस मध्ये होऊन जाईल असे सांगण्यात येते परंतु प्रॉब्लेम मोठा असेल तर डिलिव्हरी घेऊ नका कारण
नंतर बराच त्रास आपल्याला भोगावा लागतो त्यासाठी बुकिंग रक्कम फार कमी द्या
८) कार डिलिव्हरी वेळी कार जाणकार मित्राला सोबत घेऊन जा
कार घेणारा माणूस नवखा असेल तर त्याला कार मधल्या संपूर्ण गोष्टीची माहिती राहत नाही तसेच कार घेताना आपण
अति उत्साही राहतो त्या मानाणे आपला मित्र सरळ सहज असतो आपल्या नजरेतून सुटलेली गोष्ट तो सहजच पाहू शकतोच
तसेच आपल्याला पेमेंट,कागदपत्री व्यवहार अशे बरेच काम राहतात त्यामध्ये काही गोष्टी सुटू शकतात त्यामुळे फॅमिली सोबत
आपल्या मित्राला पण न्यायला विसरू नका
तर अश्या प्रकारे आपण आपला कार घेण्याचा व्यवहार चांगल्या पद्धतिने हुशार राहून नीट पार पाडू शकता कारण नंतर
कोणीही आपला ऐकत नसते किंवा त्या प्रोसेस ला भरपूर वेळ आणि त्रास होतो .
तसेच आम्ही एक व्हाट्सअप ग्रुप बनवला आहे त्या ग्रुप मध्ये सगळे लोक आपला कार घेण्याचा अनुभव किंवा काही
तक्रारी असेल तर ते मदत मागतात आम्ही त्याच्या सोबत राहून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतो
तर तुम्ही तो व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हायला विसरू नका .
धन्यवाद .!